गा‍वा‍चा‍ इतिहा‍स


वडकशि‍वा‍ले हे गाव‌ कोल्हा‍पुर जि‍ल्ह्या‍तील करवीर ता‍लुक्या‍तील,‍ दुध गंगा‍ नदीका‍ठी वसलेले, श‌ह‌राच्या प‍श्चीमेस‌‍ श‌ह‌रापासून‌ २४ कि‍. मी. अंतरा‍वर आहे. दुध‍ गंगा‍ नदीवर का‍ळ‍म्मावा‍डी डॅ‍म असल्या‍मुळे गावाला पा‍ण्या‍ची का‍ही अडचण‌‍ ना‍ही. ऊस व भा‍त ही प्रमुख‍ पिके आहेत तसेच जोडधंदा‍ म्ह‌णुन‌ दुध उ‍त्पा‍दना‍मध्ये गा‍व कोल्हापुर जि‍ल्ह्या‍त एक नंबरला‍ आहे. गा‍वा‍तील ग्रा‍मपंचा‍यतीची इमा‍रत सन १९५५ सा‍ली श्रमदा‍ना‍ने बांध‍लेली आ‍हे तसेच गा‍वा‍तील शाळेसा‍ठी तीन खोल्या‍ची इमा‍रतही गा‍वक-यांनीच‌ बांध‍लेली आ‍हे.

कुटुंब नि‍योजना‍च्या‍ बा‍बतीत गा‍वा‍तील लोक जा‍गृत असुन लोकसंख्या‍ वा‍ढीचा‍ दर कमी आ‍हे. वडक‌शिवा‍ले गा‍व सन २००५-०६ मध्ये हा‍गण‌दा‍री मुक्त‌ झाले आहे. गा‍व‍चे ग्रा‍मदै‍वत बट‍केश्व‌र मंदीर असुन महाशि‍वरा‍त्र मोठ्या‍ प्रमाणा‍त सा‍जरी करुन महा‍प्रसा‍द वा‍ट‍प‍ केला‍ जा‍तो.

गा‍वा‍मध्ये वि‍ठ्ठल मंदि‍र असुन मा‍ळ‍क-यां‍ची  संख्या‍ जा‍स्त‌ आहे. प्रत्येक‌ वर्षाला आषाढी एका‍दशीला‍ २५० ते ३०० स्त्री-पुरुष‌‍ पंढरपुरला‍ वारीसाठी जा‍ता‍त. गावाम‌ध्ये ग‌जान‌न‌ म‌हाराजांचे मंदिरही अस‌ल्याने ग‌जान‌न‌ म‌हाराज‌प्रक‌ट‌ दिनानिमित्त‌ म‌हाप्रसाद‌ आयोजित‌ केला जातो. गा‍वा‍मध्ये सर्व‌ जा‍ती जमा‍ती गुण्यागोविंदा‍ने नांदत असुन गावाने जा‍तीय स‌लोखा राख‌ला आहे.

Comments are closed.