पयाभुत सुविधा
मौजे वडकशिवाले येथे गावामध्ये पुर्ण रस्ते डांबरीकरण, कॉंक्रीट करण पुर्ण झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
शैक्षणिक सुविधा
मौजे वडकशिवाले येथे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर वडकशिवाले मध्ये दिले जाते. माध्यमिक शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागते.
आरोग्य सुविधा
वडकशिवाले येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच खाजगी दवाखानेही आहेत.
आवश्यक सुविधा
समस्या- माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांचा दवाखाना असणे गरजेचे आहे.